Friday, April 8, 2011

मटा ट्राफिक .

मटा ट्राफिक .

पादचार्यांना / सायकलस्वाराना शिस्त लावणे गरजेचे.
आज पुणे शहर ज्या प्रमाणात वाढले आहे त्या प्रमाणत आजूबाजूचा विकास होणे गरजेचे आहे. हा विकास फार कमी प्रमाणत होत असल्याचे दिसत आहे. मुख्य प्रश्न जरी रस्ते, वीज,महागाई असली तरी वाहतूक आज सर्वोगामी, मुलभूत प्रश्न बनला आहे.आज पुणे महानगरपालिकेकडून असणार्या ठिकाणी भुयारी रस्ते,वरून चालण्याचे पूल बांधण्यात आले आहेत पण त्यांचा वापर करताना कोणीच दिसून येत नाही.जंगली महाराज रोड, म्हात्रे पूल येथे बांधण्यात आलेल्या भुयारी रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.एसएनडीटी येथे बांधण्यात आलेल्या पुलावरून नागरिक जात नाहीत. आणि मग खूप वेळा ते अपघाताला निमंत्रण देत असतात. यावर एक तोडगा हाच आहे कि जे पादचारी आहेत त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. आज सायकलस्वार लोक सिग्नलला अजिबात थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे ते विरुद्ध बाजूने जिथे पाहिजे त्या बाजूने चालवतात. त्यांना वाचवण्याच्या नादात कित्येकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या सायकलस्वाराना पण आरटीओने बंधन घालावे. त्यांच्यवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत. जोपर्यंत खालच्या स्तरापासून वाहतूक प्रश्न सुधारित नाही तोपर्यंत मूळप्रश्न तसाच राहणार.
आधी मुळात म्हणजे जे दुचाकी चालक अजूनही नियम पाळताना दिसत नाहीत त्यांच्यवर कारवाई होताना दिसत नाही. कायद्याचे राज्य म्हणताना त्याची अंबलबजावणी का बरे होऊ शकत नाही ? दिल्ली वगैरे राज्यांमध्ये जसे " लेन " प्रणाली आहे तशी ती पुण्यात पण होऊ शकते. पण त्यासाठी जी इच्छाशक्ती हवी आहे ती फार कमी आहे. घोटाळे करण्यापेक्षा नगरसेवक, आमदार, खासदार यांनी हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. यासाठी राजकारण न करता एकत्र येऊन " कृती " करावी. चर्चेने प्रश्न सुटत नाहीत. ते वाढले जातात. सध्या पीएमपीएलच्या गाड्या डाव्या बाजूने जाताना दिसतात पण बाकीचे गाड्यावाले म्हणजे रिक्षावाले त्यांना उगाच त्रास देतात. पुण्यात जेवड्या बस नाहीत त्यापेक्षा जास्त रिक्षावाले आहेत.
कित्येकवेळा रिकामे रिक्षावाले उगाच मध्ये उभे राहतात किवा इतके सावकाश चालवितात कि मागे मोठी रांगच लागते. रिक्षा सेनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या चालकांना पण बसथांब्यावर न थांबण्याचे आदेश द्यावेत. त्यांनी त्यांच्या रीक्षथांब्यावर थांबावे. उपाय खूप आहेत पण नागरिकांनी विरोध न करता सक्रीय सहभाग जर दाखविला तर मेट्रो काय, बीआरटी काय साधी वाहूतक सुधा सुरळीत होईल.

- प्रणव उंडे , सहकारनगर ,पुणे .

No comments:

Post a Comment