Saturday, March 3, 2012

दिन हाका मारी ........

दिन हाका मारी द्वारी तुझ्या हरी
कधी जाईल हाक तुझ्या कानावरी
नको अंत पाहू जीव घाबरला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला

विषयाने मला दिन केले भारी
तुजवीन आता सांग कोण तारी
पाही पाही प्रभो आलो शरण तुला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला

पापी अजामेळा मुक्त केले कोणी
गणिका गजेंद्रासी उद्धरिले कोणी
उपेक्षिसी काय या दिन बाळा
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला

म्हणवितो तुझा ब्रीद राखे हरी
ठेवी चरणावरी नको लोटू दुरी
अपराधी जरी मी काय भारी तुला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला

ऐकोनिया दिन वाणी गुरुराये
नाभी नाभी ऐसे उभारोनी बाहे
रामपाठ करी भय नाही तुला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला

ऐसा दिनदयाळ सांगा कोण दुजा
घोर कलीमाजी मोक्ष केला सोपा
दीनदास म्हणे राम राम बोला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला
किती विनवू तुला रामा दयाघना
किती आळवू तुला


- प.पू. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

No comments:

Post a Comment