Wednesday, January 11, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०१.२०१२)

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०१.२०१२)

!! हरि ॐ !!


दोन हजार बारा नविन सहस्त्रक सुरू होतंय करता करता ११ वर्षे निघून गेली बारावं आलं. नव वर्षाचं स्वागत प्रत्येक जण करत आहे.


पहिला महिना जानेवारी हा इतका वेगळा असतो - नाताळाची सुट्टी संपलेली असते, फायनल exam थोड्या लांब असतात. पण दहावीसाठी जानेवारीच्या एक तारखेला पोटात खड्डा पडलेला असतो, फेब्रुवारीच्या एक तारखेला पोटात दरी पडते आणि मार्च महिन्यात काळजाचा ठोका चुकतो.

आमचं ही असचं असतं Happy Birthday करुन टाळ्या पिटून आपण ५० वा वाढदिवस साजरा करताना माणूस खूश नसतो, बाई तर अजिबात खूश नसते. आता साठी झाली एक वर्ष आणखी कमी झालं मनात कातरपणा येतो. जून ते जानेवारी आम्ही काहीही केलेलं नसतं म्हणून जानेवारी महिन्यात खड्डा पडतो, तसचं ५० पर्यंत काहीही केलेलं नसतं म्हणून खड्डा पडतो, साठाव्या वर्षी दरी पडते आणि पंच्याहत्तर नंतर काळजाचा ठोका चुकतो. हे का घडतं? कारण मनुष्य आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघत नाही.

स्टेशनवर उभे आहात आणि गाडी आली हे वाक्य ऐकलं की गाडीच्या दिशेने पळता. गाडी पकडण्यासाठी स्टेशनच्या गेटकडे पळत नाही. पण फुटपाथावर उभे असतांना हे वाक्य ऐकलं की गाडीच्या विरुद्ध दिशेने पळावं लागतं. शब्द तेच पण पळण्याची दिशा वेगळी कारण परिस्थिती वेगळी.
हे केव्हा घडतं जेव्हा वास्तवाचं भान असतं तेव्हा. आम्ही आमच्या कल्पनांत राहतो. कल्पनांचा उपयोग नवनिर्मितीसाठी योजना बनविण्यासाठी करायचा असतो मनोराज्यासाठी नाही.

स्टेशनवर असतांना गाडीच्या दिशेने धावावं लागतं आणि फुटपाथवर असतांना गाडीच्या विरुद्ध दिशेने धावावं लागतं. आपण कुठल्या दिशेने प्रवास करायचा, आपली प्रगती कुठल्या दिशेने आहे, आपल्याला संरक्षण आहे हे बघणं आवश्यक आहे.
हे केव्हा कळतं आपण जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बघतो तेव्हा. पण आपली हवी असणारी गाडी सुटते आणि नको असणारी गाडी अंगावर येऊन धडकते.
साठच्या पुढचा प्रत्येक वाढदिवस ९९.९ टक्के माणसांना दु:खकारक असतो कारण त्याच्या मनाला भितीने ग्रासलेलं असतं. भूतकाळ राक्षस होऊन खायला उठतो आतापर्यंत काय केलं? आजपर्यंत जे करता आलं नाही ते ह्या थकलेल्या जर्जर अवस्थेत कसं जमणार आणि म्हणून प्रत्येक वाढदिवस त्याच्या मृत्युचं आणि अपयशाचं सेलिब्रेशन असतं.
हे असं होऊ नये म्हणून जानेवारी महिना उत्तम आहे. वर्ष सुरु होत असतानाच गेल्या वर्षात काय काय घडलं हे पहायचं. मी काय चूका केल्या ते बघा आणि इतरांनी काय चांगलं केलं ते बघा. चूका दोनशे झाल्यातरी त्याचं ओझं होऊ देऊ नका.
नव्या वर्षात शिरताना परमेश्वरी चरणी स्वत:ला व चूकांना अर्पण करा. जोपर्यंत तुम्ही स्वत:ला अर्पण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला चूका अर्पण करता येणार नाही.

आपण स्पर्धा खेळूया
अख्खीच्या अख्खी गंगा नदी शिवलिंगावर उपडी करायची आहे कशी कराल? शक्य नाही ना. ते जाऊ दे. सगळ्या आंबांच्या झाडाचे सगळे आंबे एकही आंबा न पाडता अर्पण करायचे आहेत. कसे कराल? टोपलीत गोळा करुन, बरोबर? आणखी एक सांगतो, बागेतील सगळी फुलं एकही फुल न पाडता देवाला अर्पण करायची आहेत कशी कराल? हार, गजरा करुन बरोबर. दोनशे फूलं चिकटवण्यापेक्षा हार, माला बनवून अर्पण करण सोपं असतं.
तसचं जीवनाचं आहे. आमच्या चूका जर देवाच्या चरणी अर्पण करायच्या असतील तर त्या चूका ज्या जीवनसूत्रांनी बांधल्या आहेत ते जीवनसूत्र देवाला अर्पण करायला हवं. तोंडानेही अर्पण म्हणायचं आणि प्रयासही करायचे.


मी काल किती अर्पित होतो, किती आज्ञाधारक होतो हे गुण वाढवत न्यायचे. आपल्या जीवनात जेवढं स्थान आपल्या स्वत:च्या आरामाला असतं म्हणजे २४ तासात १/३ शारिरिक व मानसिक आरामाचं असतं.

जीवन कार्यरत असताना प्राणालाही आराम लागतो, ज्याच्यामुळे आमच्या जीवनाला आराम मिळतो, त्या प्राणांना आराम कोण देणार? मनुष्याचं हृदय दर मिनिटाला ७२ वेळा चालतं जन्मापासून मृत्युपर्यंत. दर मिनिटाला महाप्राण ७२ पावलं चालतो. तुम्ही दिवसभरात ७२ पावलं पण त्याच्यासाठी चालत नाही. तो जन्मल्यापासून मृत्युपर्यंत चालत असतो. आमचा देव आमच्यासाठी काय करतो हे बघायचं असेल तर हे दर मिनिटाला ७२ वेळा पडणारे नाडीचे ठोके बघा.

१,४४० मिनिटं दिवसाच्या २४ तासांत असतात. म्हणजे परमेश्वराचा प्रतिनिधी असणारा तो महाप्राण १,४४० वेळा ७२ पावलं टाकतो आमच्यासाठी. आम्ही एकदा तरी ७२ पावल टाकतो का परमेश्वरासाठी? तरी आम्ही कुठल्या तोंडाने विचारतो मी एवढ्या उपासना केल्या, अध्याय वाचलेत तरी असं का?
एका मिनिटात ७२ पावलं टाकून बघा पण दोन्ही पावलं समान अंतराने पडली पाहिजेत कारण नाडीचे ठोके समानपणे पडतात.
त्यानंतर अशीच दर मिनिटाला ७२ पावलं टाकून एक तास चालून बघा.
आम्हाला स्वत:साठीसुद्धा एवढं चालता येत नाही पण तो महाप्राण प्रत्येकासाठी दर मिनिटाला ७२ वेळा चालतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत अथकपणे. विचार करा जर एक क्षण त्याने विश्रांती घेतली तर? काळजाचा ठोका चुकेल ना?

भक्ती करणं, जप-तप करणं, ग्रंथ वाचणं आवश्यक आहेच. मी हे सगळं करतो म्हणून हे घडलं हा विचार करणं पाप आहे. त्याची कृपा आहे म्हणून सगळं घडतं हा विश्वास आवश्यक आहे.

आम्ही दादांनी सांगितलेले जपजाप केल्यामुळे आमचं काम झालं हा गैरसमज आहे. जेव्हा जग निर्मिती झाली तेव्हा तुम्ही कोणी प्रार्थना केली होती का?
त्याची कर्तुम शक्ती आकलना बाहेरची आहे. दादा आम्हाला जी उपासना देतात ती दादा आम्हाला त्याची कृपा स्विकारण्यासाठी (जी असतेच) समर्थ बनवण्याचा मार्ग दाखवितात.
त्याच्या कृपेचा अनुभव घेतल्यानंतर अतिशय प्रेमाने त्याला I Love You म्हणता यायला पाहिजे. काम होईपर्यंत आम्ही जपजाप regular करतो खरंतर काम झाल्यानंतर जपजाप अधिक वाढले पाहिजे.

लग्नानंतर संसार वाढला पाहिजे, लग्नाआधी मूल होणं चूकीचं आहे. घरात जे जेवण केलयं ते पचवायला पाहिजे. पोटभर जेवल्यावर आडवे होऊन चालत नाही त्यामुळे अपचनाचा त्रास होतो. जेवल्यावर हालचाल होणं आवश्यक आहे. एकदा तृप्ती झाली की शांत राहून चालणार नाही त्यानंतर activity वाढवलीच पाहिजे. तृप्ती नंतर कष्ट, श्रम, परिश्रम अधिक वाढले पाहिजेत.
पण आम्ही देवाने आमची तृप्ती केली की शांत होतो, त्यानंतर अपचन होते, ढेकर येतात. गरज सरो नि वैद्य मरो, नवस पूरा करो आणि देवाला विसरो असं करु नका.

मनुष्य मृत्युला घाबरत नाही तर अज्ञात प्रदेशाला घाबरतो. मनुष्याला मरेपर्यंत मी कसा आहे तेच कळत नाही. मनुष्याने शेवट पर्यंत कधी स्वत:ला ओळखलेलच नसतं. कधी वाटत मी चांगला आहे, तर कधी वाटतं माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मनुष्य स्वत:ला, आजूबाजूच्या परिस्थितीला ओळखतच नाही. जे यमाला कर भरतात त्यांना यमाची भिती वाटते. दुकानात वस्तूची किंमत देऊन आपण वस्तू विकत घेतो, त्या किंमतीत कर आकारलेला असतो. यम, चित्रगुप्त कर आकारतात. त्यांच्या वर असणारा भगवंत कधीच कर आकारत नाही. आम्ही पिक्चर बघायला तिकिट काढून जातो. पण जो निसर्ग बघायला टॅक्स लागतं नाही तो बघायला आम्ही जातो का? आम्ही सूर्योदय कधी बघतो का? कसलाही कर सूर्य आमच्याकडून आकारत नाही.

गोव्याला आता Sunbath festival होतं. दहा हजार भरुन Sunbath घ्यायचा. आम्हाला फुकट मिळणारी कोवळी सूर्यकिरणं नको असतात, तिकडे दहा हजार भरुन गर्दी करुन sunbath घ्यायला आवडतं.

प्रत्येक गोष्टीची आम्ही किंमत, वजन करत बसतो, पण परमात्मा जे आम्हाला फुकट देतो त्याची आम्हाला किंमत नसते.
दर मिनिटाला हा ७२ पावलं आमच्या देहात चालत असतो अबाधितपणे. आम्ही याला विसरलो तरी तो आम्हाला विसरत नाही. दिवसाला ७२ पावलं चालताना त्याच नामस्मरण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ७२ पावलं चाललं पाहिजे.
स्वत:ची सुख किंवा दु:ख वेगवेगळी वाहू नका स्वत:ला वाहा हेच हार करुन अर्पण करण आहे.
प्रसन्नशांती सर्वात महत्त्वाची असते. प्रत्येक मनुष्याला प्रसन्नशांतीच हवी असते. स्मशान शांतता भयावह असते आणि अप्रसन्न शांतता त्रासाची असते. प्रसन्न शांती मिळविण्यासाठी हा व्रताधिराज आहे. प्रपत्ती - पुरुषांची प्रपत्ती श्रावण महिन्याशी जोडलेली आहे आणि स्त्रियांची प्रपत्ती संक्रातीशी जोडलेली आहे.

बापू आमच्याकडून जे काही उपक्रम करवून घेताहेत त्याच्यामागे त्याचा इतकाच हेतू आहे - प्रत्येकाच्या जीवनाची प्रत्येक पहाट प्रसन्नतेने होईल व प्रत्येक रात्र प्रसन्नशांतीत व्हावी.
जीवनाच्या प्रत्येक पावलाबरोबर माझा गुरु माझ्याबरोबर आहेच - हा दृढविश्वास असावा.


एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा

हा ह्या वर्षीचा दृढनिश्र्चय असायला हवा.
श्रीरामचन्द्रप्रित्यर्थे जपे विनियोग: ह्या वर्षी तुम्ही जे काही जपतप, नामस्मरण कराल त्या सगळ्यांचा विनियोग हा निश्चय दृढ होण्यासाठी करा.
मी(बापू) हल्ली १९२० हा पिक्चर पाहिला होता. त्यात जो हिरो असतो त्याला एका दुसर्‍या धर्माच्या मुलीबरोबर प्रेम होतं म्हणून त्याच्या घरातील इतर माणसे त्याचे भाऊ, चुलते वगैरे त्या मुलीला मारायला येतात तो हिरोतीला वाचवतो पण त्याला ह्या सगळ्यामुळे देवाचा राग येतो, आणि तो त्याच्या गळ्यात असणारं हनुमंताचं लॉकेट काढून टाकतो आणि हनुमान चलिसा म्हणायची ही सोडून देतो. त्याच्या दुसर्‍या दिवशीपासून ते भूत बंगल्यात राहायला येतं आणि त्याच्या बायकोच्या शरीराचा ताबा ती प्रेतात्मा घेते, शेवटी जेव्हा तो हनुमान चलिसा म्हणतो तेव्हा ती प्रेतात्मा त्याच्या बायकोच्या शरीराचा ताबा सोडून जाते. आणखी एक स्टोरी त्या पिक्चरमध्ये आहे, जो प्रिस्ट त्या सैतानाला घालविण्यासाठी पवित्र मंत्र म्हणत असतो. त्याला तो सैतान आरशासमोर घेऊन येतो आणि त्याच्या धर्मगुरुने त्याला जे पवित्र स्कार्फ आशीर्वाद म्हणून दिलेलं असतं ते त्याच्या गळ्याभोवतीचं पवित्र स्कार्फ त्याला त्या आरशात सापासारखं दिसतं म्हणून प्रिस्ट ते पवित्र स्कार्फ काढून फेकून देतो आणि सैतान त्याला मारुन टाकतो.

जेव्हा आमच्या मनात विचार येतो की, हे लॉकेट घातलं, जप म्हटला म्हणून वाईट झालं कि समाजयचं सैतानाच काम सुरु झालं आहे, सैतानाने माझा घात करायचा निश्चय केलेला आहे.

ह्या वर्षात हा निश्चय दृढ करायला शिका. तुमचे आप्त असतील त्यांना करायला सांगा. बापूंचा फोटो नको असेल तर दत्तात्रेयांचा, हनुमंताचा, मायचण्डिका ह्यांचं लॉकेट घाला. ह्या निश्चयासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. ह्यावर्षी स्वल्प परिश्रमात हा निश्चय दृढ करु शकता, नंतर करता येईल पण परिश्रम लागतील.

संक्रातीच्या प्रपत्तीला शेवगाच्या शेंगाऐवजी ओले हरभरे जे त्यावेळी उपलब्ध असतात ते वापरले तरी चालतील.
जर आमचा बापू स्वत:चा शब्द न बदलता बदलायला तयार आहे. मग आम्ही ही बदलायला तयार असायला हवं. I am ready to change anywhere.!! हरि ॐ !!

No comments:

Post a Comment