Tuesday, December 20, 2011

शिवाची काही वैशिष्ट्ये

शिवाची काही वैशिष्ट्ये

नाग

शिवाच्या अंगावर ९ नाग असतात. शंकराच्या डोक्यावर एक, गळयात एक, दोन दंडात प्रत्येकी एक दोन, मनगटात प्रत्येकी एक, कमरेत एक व दोन मांड्यात प्रत्येकी एक अशा नऊ ठिकाणी हे ९ नाग असतात.
गंगा

शिवाच्या डोक्यातून गंगा वहाते. गंगा म्हणजे ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ. म्हणजे गं ग- गंगा यालाच शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली असे म्हणतात. पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदुषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते, म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तर गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे जाणवते.

त्रिनेत्र

शंकर त्रिनेत्र आहे. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला, उजवा डोळा म्हणजे दुसरा दुसरा डोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म-रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. यामुळेच शंकर भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ या त्रिकालातील घटना पाहू शकतो.

चंद्र

शिवाच्या कपाळी अर्धचंद्र असतो. मानवरूपातील शिवाच्या हातात पुढील चार आभूषणे असून ती प्रतिकात्मक आहेत. १ डमरू २. त्रिशूळ ३. पाष किंवा मृग ४ परशु.

तांडवनृत्य

शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधि अवस्था व दुसरी तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. लास्य नृत्यामध्ये हात मोकळे असतात व वेगवेगळया मुद्रा केल्या जातात. तंडून करून दाखवले ते तांडव, असे जाणून भरतादि मुनींनी ते नृत्य मानवांना शिकवले.

नंदी

नंदी म्हणजेच आनंदी. वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन आहे. त्याला शिव परिवारात महत्त्वाचे स्थान आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

No comments:

Post a Comment