Sunday, November 13, 2011

एक दु:खद ....

एक दु:खद ....
खालील लेखन स्वत: सुधीर फडके यांच्या जगाच्या पाठिवर या पुस्तकातील आहे . हे लेखन उपलब्ध केल्यामुळे राजहंस प्रकाशनाचे शतश: आभार.
लेखन पुढीप्रमाणे ...

आज हे लिहित असताना एका अतिशय खेदकारक घटनेचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. १९७७ मध्ये आकाशवाणी 'ने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यावेळी अनेक जुन्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गेली कित्येक वर्ष मी ' आकाशवाणी 'चा प्रथम श्रेणीचा गायक आहे . गाण्याबरोबरच अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम मी 'आकाशवाणी 'वर सादर केले आहेत. सतत ५६ आठवडे सलग होणारा आणि प्रथमपासून शेवटपर्यंत वर्णनातीत लोकप्रियता मिळवणारा ,'आकाशवाणी 'च्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम असा सानंद उल्लेख आकाशवाणीन आपल्या पाक्षिकात ज्या कार्यक्रमाचा केला आहे, त्या ' गीतरामायणा ' च्या दोन शिल्पकारांपैकी मी एक असूनही, या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभासाठी माझ्यासारख्या चाळीस वर्षापासूनच्या कलाकाराची 'आकाशवाणी 'ला आठवण झाली नाही. साधे निमंत्रणसुधा माझ्याकडे आले नाही. यामुळे माझे नुकसान जरी काहीच झाले नाही, तरीपण खेद मात्र अवश्य वाटला. 'आकाशवाणी' वर माझी लोकप्रियता अवलंबून नाही. ती मी माझ्या गुणाने, कष्टाने,प्रामाणिकपणाने मिळवली आहे . ' आकाशवाणी ' कडून मला सत्काराची अपेक्षा नव्हती. पण आदरपूर्वक निमंत्रणाची अवश्य होती.



बाबूजी याचे हे लेखन मला पुस्तक वाचताना आढळून आले आणि मी लगेच येथे आणले आहे. तसेही बाबूजी याचे जीवन म्हणजेच ' जगाच्या पाठीवर ' या चित्रपटाची संकल्पना. आपल्यापुढे ही शोकांतिका आणताना मनात अनेक प्रश्न उत्पन होतात. अश्या दिग्गजांबरोबर आकाशवाणीने जो बाजार मांडला आहे तो कधी संपणार हे त्या विधात्यालाच ठाऊक !!!
पुनश्च एकदा राजहंस प्रकाशन, श्रीधर फडके व स्वत बाबूजी यांचे आभार. आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

No comments:

Post a Comment