Thursday, October 6, 2011

जय साईराम


अगाध शक्ती अघटीत लीला तव सदगुरुराया |
जड्जीवाते भवि ताराया तू नौका सदया ||

वेणीमाधव आपण होऊनी प्रयाग पद केले |
गंगा - यमुना द्वय अन्गुष्टी प्रवाह दाखविले || १ ||

कमलोदभव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती |
तूची होऊनी साईसमर्था विचरसी भूवरती || २ ||

प्रहर दिसाला ब्रह्मसम ते न्यान मुखे वदसि |
तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधी कधी दाखविसी || ३ ||

कधी कधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी |
भक्तमनासी सरस करुनी मराळ तू बनसी || ४ ||

यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा |
हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा || ५ ||

धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी |
फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी || ६ ||

तवौकसाते मशीद म्हणू तरी वन्ही ते ठाया |
धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया || ७ ||

सकाळपासुनी भक्त साबडे पूजन तव करिती |
माध्यानीला दिनकर येता होत असे आरती || ८ ||

चहू बाजूना पार्षदगणसम भक्त उभे राहती |
चौरी चामरे करी धरुनी तुजवरी ढाळीती || ९ ||

शिंग कड्याळे सूर सनय्या दणदणते घंटा |
चोपदार ललकारती द्वारी घालूनिया पट्टा || १० ||

आरतीसमयी दिव्यासनी तू कमलावर दिससी |
प्रदोषकाळी बसुनी धुनिपुढे मदनदहन होसी || ११ ||

अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तव ठायी |
प्रचीतीस येताती आमुच्या हे बाबा साई || १२ ||

ऐसे असता उगीच मन्मन भटकत हे फिरते |
आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते || १३ ||

अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया |
आलो निवारा दासगणुंचे त्रिताप गुरुराया || १४ ||

जय साईराम. आज साईनी निर्वाण होऊन फार मोठा काळ गेला पण साई आजही आपल्यात आहेत आणि ते प्रत्येकाला साथ देत आहेत.जेथे जेथे प्रेम,सत्य आणि आनंद आहे तिथे साई आहेतच.साईचा आशीर्वाद आपल्यासमवेत असाच राहो हीच सद्गुरुचरणी विनम्र प्रार्थना.
राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज कि जय ||

No comments:

Post a Comment